Haunted Pune – पुण्यातली ७ झपाटलेली ठिकाणे


सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे शहर. झपाट्याने प्रगत होत असणाऱ्या या शहरात अशी काही ठिकाणं आहेत जिथे रात्री अप रात्री जायला लोक आवर्जून टाळतात.

1. चंदन नगर – 

घड्याळात रात्रीचे १२ वाजण्या आधी तुम्ही दार खिडक्या घट्ट लाऊन घेतल्या पाहिजेत नाही तर ती तिच्या लहान बाहुली सोबत येईल. पुण्यातल्या चंदन नगर परिसरात काही वर्षांपूर्वी असे काही अघटीत घडले होते की त्यानंतर लोक रात्री बाहेर पडायला घाबरतात. साधारण १५ वर्षांपूर्वी इमारतीच्या अपघातात एका १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या घटने नंतर कित्येक लोकांना ती दिसली आहे. हातात लहान बाहुली घेऊन वेदनेने किंचाळत ती धावताना दिसते. त्या मुलीचा आत्मा चंदन नगर च्या परिसरात वावरतोय असे तिथले लोक म्हणातात.

2. विक्ट्री थिएटर – 

जवळपास पन्नास वर्ष जून असणारे पुण्यातले हे थिएटर अनेक भूतानी झपाटले आहे. थिएटर रिकामे असताना रात्रीच्या वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांना माणसाच्या कुज बुजण्याचे आणि खुर्च्या वाजण्याचे आवाज ऐकू येतात. तर कधी चित्र विचित्र आकृत्या दिसतात. अनेक कर्मचारी ही जागा शापित असल्याचे सांगतात. 

3. सिंहगड – 

काही वर्षांपूर्वी एका बसला अपघात होऊन बरीच लहान मुले दगावली होती. इथे येणाऱ्या लोकांना त्या लहान मुलांचे आवाज आणि किंचाळ्या ऐकू येतात. इतकेच नव्हे तर कधी एक पांढरी वस्त्र धारण केलेला माणूस एका विशिष्ठ कठड्यावर उभा दिसतो आणि आपण त्याच्या कडे बघत असताना तो दरीत उडी घेतो. या परिसरात सूर्यास्त होण्याआधीच पर्यटकांची गर्दी हळू हळू कमी होऊ लागते.

4. सिंबायोसिस रोड, विमाननगर

सिसिडी पासून सिंबायोसिस कडे जाणाऱ्या रोड वर रात्री चित्र विचित्र भास होतात. अचानक कुत्रे एका ठिकाणी पाहून भूंकायला लागतात जिथे आपल्याला कोणीही दिसत नाही. या परिसरात राहायला येणाऱ्या नवीन विद्यार्थ्या ना आणि रहिवाशांना रात्री अपरात्री बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. काही वाहन चालकांना अचानक डोळ्यासमोर अंधारी येऊन अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

5. शनिवार वाडा

शनिवार वाड्या बद्दल बहुतेक लोकांनी ऐकले असेल. कट कारस्थान करून निर्घृण पणे हत्या केलेल्या नारायण रावाचा आत्मा अजूनही या वाड्यात बंदिस्त आहे असे म्हणतात. त्याला मारताना त्याच्या तोंडून वाचवण्यासाठी मारलेल्या हाका ‘काका मला वाचवा’ आजही ऐकू येतात. साडेसहा नंतर पर्यटकांना वाड्याच्या परिसरात प्रवेश कारणासाठी मनाई आहे.

6. चॉईस हॉस्टेल, कर्वे रोड

कर्वे रोड च्याच प्रसिद्ध चॉईस हॉस्टेल मध्ये भुताटकी आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. असे म्हणतात की हॉस्टेल क्या कोरी डॉ अर् मध्ये अनेकदा मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. पण तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते ते भूत कोणाला कधी त्रास देत नाही.

7. होळकर ब्रीज

१८ व्या शतकात बांधला गेलेला हा ब्रीज पुण्यातल्या सगळ्यात भयानक ठिकाणांपैकी एक आहे. कित्येक गूढ मृत्यू इथे नोंदले गेले आहेत. या ब्रीज वरून वाहन चालवत असताना कोणी तरी किंचाळत असल्याचा आवाज ऐकू येतो आणि लक्ष विचलित झाल्यामुळे वाहना वरचा ताबा सुटून अपघात होतो. यामागचे कारण अजूनही अज्ञात आहे.

तुम्ही या ठिकाणांपैकी कोणते ठिकाण पाहिले आहे आणि जर नसेल पाहिले तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की कळवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *