अनुभव – गौरव नाईक

मी मूळचा मुंबई चा असून सध्या गोव्यात वास्तव्याला आहे. माझ्या बद्दल ची एक विचित्र गोष्ट म्हणजे लहानपणा पासून मला आमच्या घरातील आणि जवळच्या मृत व्यक्तीची चाहूल जाणवते. हे आज पर्यंत मी घरात कोणालाच सांगितले नाही कारण याचा त्रास मला कधीच झाला नाही.

आता गोव्यात राहत असल्याने वेळ मिळाल्यावर समुद्र किनारी जाऊन निवांत बसणे हे नेहमीचेच झाले आहे. काल सकाळी मला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी समुद्रकिनारी जाऊन बसलो होतो. माहीत नाही पण तिथे जाऊन , त्या शांत वातावरणात अगदी प्रसन्न वाटत. मी जिथे राहतो त्या रस्त्यापासून किनाऱ्यावर जाण्यासाठी एक पायवाट आहे. 

त्या वाटेवरून चालत असताना मला एक वेगळीच चाहूल जाणवू लागली. सतत असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या सोबत चालतंय. परिसरात कावळ्यांचा आवाज आणि रॅट किड्यांची किर्रर्र ऐकू येत होती पण माझे कान त्या अनोळखी चाहूल चा वेध घेत होते.

मनात पहिल्यांदा एक वेगळीच भीती जाणवत होती. तरीही मी एका ठिकाणी जाउन बसलो. मी माझा मोबाईल घेऊन कानात इअर फोन्स घालून गाणी ऐकत बसलो होतो. काही वेळा नंतर मला तीच चाहूल पुन्हा जाणवू लागली. असे वाटत होते की माझ्या पाठीमागून कोणी तरी जोर जोरात श्वास घेतय. 

गाणे सुरू करून मी मोबाईल चा डिस्प्ले ऑफ केला आणि माझे लक्ष मोबाईल च्या स्क्रीन वर गेले. विजेचा झटका लागावा तसे माझे पूर्ण अंग शहारले, भीतीने अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. त्या बंद स्क्रीन वर मागे उभ्या असलेल्या एका बाईची आकृती एका क्षणापूर्ती दिसली आणि अचानक नाहीशी झाली. 

मी तिथून उठून सरळ घराच्या दिशेने धावत सुटलो. घडलेल्या प्रकाराबद्दल मी अजून घरी सांगितले नाही पण आता मात्र समुद्र किनाऱ्यावर जायची भीतीच वाटू लागली आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडीओ चे नोटिफिकेशन लगेचच मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. 

Leave a Reply